Daan Pawala

About The Book

''दान पावलं...! या पुस्तकात ''अवयवदान'' प्रक्रियेसंबंधी सर्व तपशील लेखिका प्रा. सुरेखा शिखरे यांनी सविस्तर मांडला आहे. ''अवयवदान'' हे सर्वश्रेष्ठ दान आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. दान करता येणारे अवयव अवयव प्रत्यारोपण त्याचे समन्वयक भारतातील अवयव प्रत्यारोपण कायदे अवयवदानातील प्रमुख कार्यरत संस्था आणि अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हॉस्पिटल्सची यादी यांचा संमावेश यात करण्यात आला आहे. अवयवदानाचे महत्त्व गैरसमज त्यासंबंधीचे कायदे कोणता अवयव केव्हा कसा किती कालावधीत दान करता येतो तसेच ''ब्रेन डेथ'' ''ग्रीन कॉरिडॉर'' दुर्मिळ अवयवाचे प्रत्यारोपण याची माहितीही देण्यात आली आहे. अवयवदान करणारे दाते व गरजवंत त्यांचे नातेवाईक डॉक्टर्स हॉस्पिटल्स या सर्वांनाच या पुस्तकाचा फायदा होईल. संचेती हॉस्पिटलचे डॉ. के. एच. संचेती सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉ. बिपिन विभूते यांच्यासह अनेक डॉक्टरांनी सर्वसामान्यांना उपयुक्त पुस्तक म्हणून याची प्रशंसा केली आहे. लेखिकेविषयी माहिती : प्रा. सुरेखा कृष्णा शिखरे या एमए एमएड असून त्यांनी एमएस (मानसशास्त्र) पूर्ण केले आहे. हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयात पंचवीस वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले. विवाहपूर्व व वैवाहिक आणि कौटुंबिक समुपदेशक म्हणूनही त्या काम करत आहेत. पुष्पौषधी प्राणिक हीलिंग रेकी हिप्नॉटिझम यांसारख्या अनेक विषयातील कोर्सेस त्यांनी पूर्ण केले आहेत. अवयवदानसारख्या सामाजिक उपक्रमात त्या सक्रिय सहभाग घेत असतात. गरजू विद्यार्थ्यांना केलेल्या शैक्षणिक मदतीबद्दल त्यांना ‘सावित्रीबाई फुले’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE