*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹122
₹135
9% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
लेखनापेक्षा मी जीवनावर अधिक प्रेम करतो. लिहिण्यापेक्षा लहान मुलांशी खेळणे माणसांत मिसळणे किंवा एखादी नवीन कला शिकणे यांत मी अधिक रमतो. हे उद्गार आहेत अभिजात नाटककार विजय तेंडुलकर यांचे. तत्कालीन नाटककारांच्या नाटकांहून तेंडुलकरांच्या नाटकांचे वेगळेपण म्हणजे प्रत्येक नाटकात त्यांनी माणसाच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. माणूस आणि त्याचे मन माणसाचे एकटेपण ह्याला नाट्यविषय करण्याचा प्रथम प्रयत्न तेंडुलकरांच्या नाटकांतून झालेला दिसतो. त्यादृष्टीने तेंडुलकरांनी चाकोरीत फिरणाऱ्या मराठी नाटकांना नवी दिशा मिळवून दिली असे म्हणता येईल. नाटकांच्या कथाविषयाबरोबरच त्यांनी नाटकांच्या तंत्रातही उत्तरोत्तर बदल केले व तंत्रदृष्ट्याही मराठी नाटक संपन्न झाले. विजय तेंडुलकरांच्या अनेक नाटकांचे इतर भाषांमध्येही भाषांतर झालेले आहे. त्यामुळे तेंडुलकर हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय नाटककार ठरतात. त्याशिवाय कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार संगीत नाटक अकादेमी पुरस्कार कालिदास सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार इत्यादी सन्मानही त्यांना मिळाले आहेत.