*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹253
₹350
27% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
या पुस्तकामध्ये करण यांनी त्यांचं बालपण डून स्कूलमधील शालेय जीवन नेहरू-गांधी घराण्याशी असलेली जवळीक आणि तारुण्यामध्ये फुललेली प्रेमकथा अशा अनेक व्यक्तिगत आठवणी शब्दांकित केल्या आहेत. न्यूज चॅनेलवर होणार्या मुलाखतींच्या कार्यक्रमांमुळे करण थापर मुख्यत: ओळखले जातात. पी. व्ही. नरसिंह राव अटल बिहारी वाजपेयी जयललिता परवेज मुशर्रफ बराक ओबामा कपिल देव सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन आणि नरेंद्र मोदी ही त्या मुलाखतींची काही प्रातिनिधिक उदाहरणं. करण यांच्या गाजलेल्या मुलाखती त्या वेळी पडद्यामागे घडलेल्या अनपेक्षित घटना हा या पुस्तकातील महत्त्वाचा भाग आहे. एका पत्रकारानं त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांचा सुख-दु:खाच्या क्षणांचा रिपोर्ताज वाचकांसमोर सादर केला आहे. तो वाचताना आपण त्याच्याशी समरस होतो. त्यामध्ये रमून जातो.