*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹248
₹375
33% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
कादंबरीकार म्हणून उद्धव ज. शेळके यांना उदंड कीर्ती मिळवून देणारी ‘धग’ ही कादंबरी आहे एका शिंपिणीची कहाणी. परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही गाथा. ‘कौतिक’ ही एक सामान्य स्त्री पण तिची झुंज असामान्य आहे. परिस्थितीपुढे ती वाकते आणि म्हणूनच कादंबरी मनाला अधिक जाऊन भिडते. कारण हा शेवट अपरिहार्य असतो. स्थितीचे अनुलंघ्य कवच फोडण्यासाठी ऊरफोड करणारा माणूस हाच ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. ही कादंबरी पूर्णतः ग्रामीण वातावरणातील आहे. तिच्यातील बोली वऱ्हांडी आहे. प्रादेशिक कादंबरी म्हणून तिचा कुणी गौरवाने उल्लेख करतात तर प्रादेशिकता हे वास्तववादाचे विस्तृतीकरण असल्यामुळे ते साहित्यिक होऊ शकत नाही अशीही बाजू मांडली जाते. प्रादेशिकता हे मूल्य होऊ शकत नाही. साहित्यिक तर नाहीच नाही. पण त्या प्रकारची कृती मात्र श्रेष्ठ साहित्यकृती निःसंशय ठरू शकते. बोलीभाषेतील ही कृती अभ्यासताना बुजरेपणा आणि अनास्था ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर ‘धग’ वाचतांना अडचण पडत नाही. शब्द स्वतःचा अर्थ सांगत जातात. वाट सापडत राहते आणि कौतिकचा हा असामान्य लढा मनाला जाऊन भिडतो. ‘धग’ची शैली साधी आहे. निरलंकृत आहे. नीरगांठ सूरगांठ व शेवटी उकल करण्यासाठी हेतूतः राखून ठेवलेली क्षणरहस्ये ती जपण्यासाठी योगायोगांचा फाफटपसारा असे इथे काही नाही. उत्कटता हा तिचा हृद्य विशेष आहे. कठोर वास्तवदर्शन हा तिचा हेतू आहे आणि म्हणून चाकोरीतल्या कादंबऱ्याहून वेगळी पडणारी ‘धग’ रसरशीत उतरलेली आहे.