डॉ. आंबेडकरांच्या उपलब्ध असलेल्या सर्व ग्रंथसंपदेचा एकत्रित स्वरुपात विश्लेषक असा परिचय या पुस्तकात आहे. पण हा ग्रंथ म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या संपूर्ण विचारांची चिकित्सा नव्हे किंवा ग्रंथांची समीक्षा नव्हे!...महापुरुषाच्या लेखन-उत्त्कीत अनेक प्रसंगी अंतर्विरोधही दिसून येतो. हा अंतर्विरोध दाखवून देत आंबेडकरी विचारांची संगती वाचकांसमोर ठेवणे हा या ग्रंथाचा हेतू आहे... डॉ. आंबेडकरांच्या लेखनात व्यक्त झालेले बदल वा अंतर्विरोध हे त्यांच्या कार्यक्रमाधिष्ठित प्रवासाशी कसे सुसंगत आहेत त्याचाही अन्वय या ग्रंथात आहे.... अतिशय निकोप मनाने या ग्रंथाचे स्वागत करायला हवे... योग्य दिशेनेच दखल घेतली जावी. - दत्ता भगत