आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान आणि प्रयोगांद्वारे सिद्ध केलेले दर्जेदार फायदेशीर द्राक्षशेतीचे दाभोळकर प्रयोग परिवार पुरस्कृत नवे मॉडल! द्राक्षशेतीचे नवे तंत्र या पुस्तकाद्वारे वेगवेगळ्या समस्यांनी अडचणीत असलेल्या द्राक्षशेतीस फायदेशीर बनविण्याचे तंत्र दाभोळकर प्रयोग परिवारातील प्रयोगशील शेतकरी वासुदेव चिमणराव काठे यांनी सांगितले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल यात शंका नाही. सहज-सोप्या तंत्रशुद्ध पद्धतीने द्राक्षशेतीच्या सुरूवातीपासून ते बाजारात द्राक्षमाल पोहोचेपर्यंतच्या बारीक-सारीक गोष्टींचे प्रयोगाअंती सफल झालेले ज्ञान या पुस्तकातून मिळते. अनेक शास्त्रज्ञ अभ्यासकांच्या अभ्यासपूर्ण नोंदींचा समावेश हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. थोडक्यात द्राक्षशेतीतील वेगवेगळ्या प्रश्नांच्या समस्यांच्या निराकरणासाठी त्यावरील उपाययोजनांसाठी म्हणून हे पुस्तक शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करेल. लेखकाविषयी : लेखक वासुदेव काठे हे प्रसिद्ध अशा दाभोळकर प्रयोग परिवार महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक आहेत. वासुदेव काठे यांनी आजवर द्राक्ष पिकावर दोनशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. तसेच सकाळ माध्यम समूहाच्या अॅग्रोवन या कृषी दैनिकातून शंभरहून अधिक लेख प्रसिद्ध केले आहेत. वासुदेव काठे यांना संशोधक शेतकरी पुरस्कार कृषीभूषण पुरस्कार (यवतमाळ पुसद) द्राक्षभूषण पुरस्कार राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरकडून इनोव्हेटिव्ह फार्मर पुरस्कार आदी पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून वेळोवेळी केलेल्या प्रयोगांसाठीही सन्मानित कर
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.