Gaban

About The Book

मुन्शी प्रेमचंद हे नाव हिंदी साहित्यातील अजरामर लेखकांपैकी एक आहे. उपन्याससम्राट ही उपाधी त्यांना बहाल केली गेलेली आहे. त्यांनी १९३१ मध्ये लिहिलेली गबन ही कादंबरी हिंदीतून मराठीत अनुवादित करणे ही अतिशय आव्हानात्मक बाब होती. त्या काळातील समाजावरचा ब्रिटिश मुन्शी प्रेमचंद यांच्या गबनचे मराठी भाषांतर करण्याची संधी मिळणे म्हणजे मराठी साहित्याच्या इतिहासात पाऊलखूण उमटवण्याची संधी मिळाल्यासारखेच आहे. ह्यासाठी वरदा प्रकाशनच्या श्री. गौरव गौर ह्यांची मी आभारी आहे. श्री. अनिल साठ्ये यांनी टायपिंगची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. वरदा प्रकाशनची पूर्ण टीमच ह्या पुस्तकाच्या पूर्णत्वासाठी झटली आहे. संस्कृतीचा प्रभाव कनिष्ट-मध्यमवर्गीयांची बदलती मूल्ये आयुष्यातील अटळ दुःखे आणि श्रेष्ठतम मानवी मूल्ये ह्या सगळ्यांनी परिपूर्ण असणारी गबन ही कादंबरी वाचकाला गुरफटून टाकते. मुन्शी प्रेमचंद यांची कथानक पुढे नेण्याची शैली प्रत्येक पात्राला दमदारपणे स्वतःच्या स्वभावगुणांनी उभे करण्याची हातोटी आणि त्यांच्या मानसिकतेचा व्यक्तीच्या स्वभावांचा अभ्यास संपूर्ण कादंबरीवर पकड ठेवतो. त्याचबरोबर उत्तरभारतातील ग्रामीण-हिंदी भाषा ! ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन गबनचे मराठी भाषांतर करणे ही खरी माझ्या क्षमतेची कसोटी होती. एका सुखद अंतर्गत विकासाची ती अनुभूती होती. पुढे काय होईल ह्याची जिज्ञासा शिगेला पोहचत जाते तसतशी ही कादंबरी आणखीनच खोलवरच्या नैतिक मूल्यांना स्पर्श करत जाते. एकेका पात्राची एक माणूस म्हणून असणारी उंची वाचकाला श्रेष्ठतम वाचनानुभव देत जाते.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE