*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹110
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
आजच्या परिस्थितीवर तिरकस भाष्य करणारं हे नाटक उपरोध उपहास आणि अतिशयोक्ती या विनोदास्त्राचा वापर करत लीलया रचलं आहे. नाटकाची रचना कानेटकरी असली तरी त्याची हाताळणी मात्र खास शफाहत खानी आहे....अस्वल जसं गुदगुल्या करत मारतं तसं हे नाटक हसवता हसवता प्रेक्षकांचं वस्त्रहरण करतं. वरपांगी थिल्लर वाटणारे विनोद प्रत्यक्षात अत्यंत धारदार जखमा करतात.एक प्रयोगशील नाटककार जेव्हा लोकप्रिय धंदेवाईक नाटकाची शैली उचलून आपलं नाटक रचतो तेव्हा त्या मागे नक्कीच काही हेतू असतो. जगभर पोस्ट मॉर्डनिस्ट कलावंतांनी आपल्या अभिव्यक्तीसाठी पॉप आर्टचा आसरा घेतला आहे. या नाटकाच्या मांडणीसाठी शफाअत खान साठच्या दशकातील मेलोड्रॅमॅटिक नाटकाच्या शैलीचा आणि आकृतीबंधाचा वापर करतात.