*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹110
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘गांधी : अंतिम पर्व’रत्नाकर मतकरीमहात्मा गांधींनी केवळ विशिष्ट काळासाठी काम केलेले नाही. त्यांची दूरदृष्टी सर्व मर्त्य सीमा ओलांडणारी होती. राजकारणात मूल्यांच्या प्रत्यक्ष आचरणाबाबत त्यांचा आग्रह होता.आज राजकारणात बोलायचे एक आणि करायचे भलतेच या पद्धतीची चलती आहे. उच्च बोलताना तशा आचरणाची जराही जबाबदारी स्वीकारायची नाही हे पुढारीपणाचे सर्वमान्य समीकरण केले गेले आहे. अशा वातावरणात गांधींना मनोमन स्वीकारणे आणि त्याबरहुकूम आचरण करणे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला जिकिरीचे आहे.या परिस्थितीत रत्नाकर मतकरींनी ‘गांधी : अंतिम पर्व’ या त्यांच्या नाटकातून एक जबरदस्त अनुभव संवेदनशील रसिकांसाठी दिलेला आहे. मतकरींचे संपूर्ण सत्याधारित लेखन आणि सहजपणे साधलेली नाट्यमयता यातून हे नाटक मनाचा ठाव घेते.