GOSHTICHE ATM
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

‘गोष्टींचं एटीएम’ हा हलक्यापुâलक्या खुसखुशीत कथांचा संग्रह आहे. दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा या कथा आहेत. ‘बँकेतले पगार बंद’ असं सक्र्युलर निघालं तर काय होईल असं कल्पनाचित्र ‘बँकेतले पगार बंद!’ या कथेत रेखाटलं आहे. बँकेत पगार न मिळता कोणता कर्मचारी किती ठेवी गोळा करेल यावर त्याचं कमिशन ठरेल असं सक्र्युलर निघतं आणि मग काय गमतीजमती होतात ते या कथेत सांगितलं आहे. ‘गृहिणींना हक्काची सुट्टी’ या कथेत गृहिणींना कायद्याने हक्काची सुट्टी मिळते; पण लेखकाची बायको त्या सुट्टीचा कसा बोजवारा उडवते याचं मनोरंजक चित्रण या कथेतून केलं आहे. बँकेत जर सगळे वयोवृद्धच कर्मचारी असतील तर काय होतं याचं खुसखुसशीत चित्रण वाचायला मिळतं ‘वयोवृद्धांची बँक’ या कथेतून. असंच खुसखुशीत चित्रण असलेली आणखी एक कथा म्हणजे ‘बँकेत मूव्हर्स अ‍ॅन्ड शेकर्स’. टीव्हीवर गाजत असलेला ‘मूव्हर्स अ‍ॅन्ड शेकर्स’ हा रिअ‍ॅलिटी शो बँकेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सादर करायचा असं बँक कर्मचारी ठरवतात. तो रिअ‍ॅलिटी शो पाहण्यासाठी शेखर सुमन यायचं कबूल करतात. त्या शोची पूर्वतयारी करताना आणि प्रत्यक्ष तो शो करताना काय काय गमती घडतात याचं रंजक शैलीत वर्णन केलं आहे. ‘अगत्यशील (?) ग्राहक’ ही आणखी एक रंजक कथा. घुकणी बुद्रुक नावाच्या खेडेगावात पंधरा दिवसांसाठी लेखकाची बदली होते. तिथे गेल्यावर लेखकाला जे मजेदार अनुभव येतात ते लेखकाने हलक्यपुâलक्या शैलीत सांगितले आहेत. बँकेत आलेल्या ग्राहकाला बँक कर्मचारी कशी वागणूक देतात आणि एखादा खातेदार त्याचं उट्टं कसं काढतो याचं मनोरंजक चित्रण केलं आहे ‘बँकेत चिमण’ या कथेत. तर ‘वॅâश मंत्र’ या कथेत बँकेतीलच एक कर्मचारी बँकेच्या वॅâशमधील तीन हजार रुपये लांबवतो. त्याच्याकडून त्याचा कबुलीजबाब घेण्यासाठी अन्य कर्मचारी काय क्ऌप्ती योजतात याची ही हकिगत आहे. ‘लोका सांगे...’ ही कथा आहे लेखकाच्या पत्नीच्या हजरजबाबीपणाची. लोकांशी कसं वागावं यावर बायकोला व्याख्यान देत असताना बायको लेखकाची कशी विकेट घेते याचं हलवंâपुâलवंâ चित्रण या कथेत आहे. खातेदार आणि बँक यांच्यातील नात्याचं हळुवार दर्शन घडवलंय ‘नातवासासारखी प्रेमळ बँक’ या कथेतून. काळे सर हे बँकेचे ग्राहक असतात. बँकेच्या एका चुकीमुळे त्यांना मनस्ताप होतो आणि वीस वर्षांपासून बँकेत असलेलं खातं ते बंद करून टाकतात; पण बँकेशी त्यांचे परत ऋणानुबंध जुळतात असं या कथेचं कथानक आहे. एका साप्ताहिकात ‘मी असा आहे’ हे नामवंतांच्या मुलाखतीचं सदर संजय कदम चालवत असतो. वाचकांचा उदंड प्रतिसाद या सदराला मिळत असतानाच एका वाचकाचं त्यांना पत्र येतं. त्या पत्रात त्याने मुलाखतींमधील तोचतोपणावर टीका केलेली असते. म्हणून संजय कदम एका सामान्य गरीब माणसाची मुलाखत घेतो आणि त्याच्याकडून मिळालेली प्रश्नांची उत्तरं संजयला बरंच काही सांगून जातात असा आशय आहे ‘गरिबाची श्रीमंत मुलाखत’ या कथेचा. ‘मुदत ठेव - एक पदवीदान’ या कथेतील नाना निवृत्तीनंतर अक्षर सुधारण्याचं महत्त्व लोकांना पटवून देण्याचं काम करत असतात. एक बी. कॉम. झालेला विद्यार्थी त्याच्या पदवी प्रमाणपत्रावरील त्याच्या आडनावाचं स्पेलिंग दुरुस्त करण्यासाठी येतो आणि विद्यापीठाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतो. नानांना जेव्हा बँकेतून त्यांची मुदत ठेव पावती मिळते तेव्हा त्यावरील गलिच्छ अक्षर पाहून नाना व्यथित होतात. त्या पावतीवरचं अक्षर त्यांच्याकडे आलेल्या त्या विद्याथ्र्याचं असतं अशा साध्या प्रसंगांतून साकारलेली ही कथा आहे. ‘सेंटेड टोकन’ या कथेत बँकेत येणाNया एका कॉलेजवयीन तरुणीकडे आकृष्ट झालेल्या तरुण बँक कर्मचाNयाच्या भावनांचं दर्शन घडवलं आहे. रामभाऊंचा सोनारकामाचा धंदा बंद पडतो. म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन ते वेल्डिंग मशिन घेतात; पण वेल्डिंगचे काम करताना त्यांचा एक डोळा जातो. त्याचा परिणाम होऊन वेल्डिंगचा धंदाही बंद पडतो. बँक कर्ज वसूल करण्यासाठी त्यांच्या घरावर जप्ती आणायचं ठरवते; पण बँकेचा मॅनेजर ही जप्ती टाळतो आणि कर्जपेâडीचा एक नवीन मार्ग त्यांना उपलब्ध करून देतो असं कथानक आहे ‘अजब वसुली’ या कथेचं. तर अशा या खुसखुशीत हलक्यापुâलक्या कथा वाचनीय आहेत.
downArrow

Details