Grameen Matang Stree : Ek Samajshastriya Abhyas


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

भारतीय समाजरचनेचा अभ्यास केल्यास असेच लक्षात येते की जातिभेदाबरोबरच पुरुष प्रधानता व लिंगभेद यालाही तेवढेच महत्त्व दिलेले आहे. स्त्रियांच्या भूमिका व दर्जा याबद्दल जेव्हा विचार केला जातो तेव्हा लक्षात आले की पुरुषप्रधानता जातिभेद लिंगभेद या तिहेरी शोषणाची ‘ती’ बळी आहे. अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेल्या ५९ जातींची ओळख अस्पृश्य व दलित जाती म्हणून आहे. या जातींमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या महार मातंग चांभार या जाती लोकसंख्येने अधिक आहेत. अनुसूचित जातीतील कनिष्ठ व वंचित जात म्हणून मातंग जातीबद्दल काही अभ्यास व संशोधन झालेले आहे; परंतु मातंग स्त्रियांचा दर्जा व भूमिका प्रश्न व समस्या याबद्दलची फारशी मांडणी संशोधनातून व अभ्यासातून झालेली नाही. मातंग स्त्री ही स्वतंत्र लिखाण व अभ्यासापासून वंचित होती; त्यामुळेच संशोधक म्हणून दलित मातंग स्त्रियांबद्दल स्वतंत्र संशोधन करून ती तिहेरी शोषणास कशी बळी पडते. तिचे प्रश्न व समस्या इतर स्त्रियांपेक्षा वेगळ्या आहेत. याकडे स्त्री चळवळीने दलित चळवळीने स्त्री अभ्यासकांनी कसे दुर्लक्ष केले. या व इतर बाबींचा आढावा या संदर्भग्रंथातून घेतला आहे.
downArrow

Details