*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹378
₹399
5% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
*जन्मतः हृदयरोगाने ग्रासलेली एक तरुणी जिने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे जीवनात पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगली अशा ज्योती मुंगसेची ही जीवन कहाणी म्हणजे हसरा संघर्ष हे पुस्तक! * डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी सहज सुंदर शब्दांत ज्योतीचे आयुष्य चितारले आहे. * ज्योतीने आपल्या जन्मजात आजाराचे भांडवल न करता नृत्य ट्रेकिंग कुकिंग हे आपले छंद जोपासले. येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं! हे आयुष्याचे सूत्र ठरवून ज्योती जीवन कशी जगली याचे कथन म्हणजे हे पुस्तक! *मरण आज येईल की उद्या येईल; हे सांगता येत नसताना मरणाला हुलकावणी देत ४६ वर्षांचे आयुष्य ज्योती जगली; ते केवळ तिच्या सकारात्मक विचारांवर! हे तिचे प्रेरणादायी आयुष्य येथे मांडले आहे. *कुटुंबीय शिक्षक मैत्रिणी डॉक्टर या सर्वांना तिने आपलेसे केले. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हसत हसत आयुष्य कसे जगावे याचा आदर्शच तिने घालून दिला. * अभिनेते स्व. डॉ. श्रीराम लागू दीपा लागू यांची ती मानस कन्या होती! प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ तिची जगण्याची जिद्द पाहून तिला लढवय्या म्हणत! तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका नसीमा हुरजूक ह्या ज्योतीच्या स्फूर्तिस्थान होत्या! या सर्वांचे हृदयस्पर्शी वर्णन यामध्ये आहे. *आपल्यासारख्याच हृदयरोगाने ग्रस्त असणाऱ्यांना मदत व्हावी यासाठी हृदय-ज्योत संस्थेची तिने स्थापना केली. दु:ख वेदना बाजूला सारून आनंदी आयुष्य ज्योती जगली! खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणा देणारा तिचा जीवनप्रवासाविषयीचे हे पुस्तक! ‘Hasara Sangharsh’ is a true and inspiring story of late Jyoti Mungase. She was a divine lady whose heart was physically weak but mentally her heart was very strong. Writer and a counselor Dr. Pratibha Deshpande has written her enthusiastic and amazing life story in a very interesting manner.