आपण लिहिलेला “हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास मी वाचून पाहिला. सदरह पुस्तकामध्ये आजपर्यंत उपलब्ध असलेल्या इतिहासग्रंथाचा संक्षेप फार चांगल्या रीतीने आणला आहे. भाषा स्पष्ट असून सरळ आहे. विषयाची व्यवस्था चांगली निवडक असून सुबोध केलेली आहे. एकंदरीत आपले पुस्तक विद्यार्थ्यास फार उपयोगी पडेल अशी माझी समजूत आहे.(सही) रामचंद्र भिकाजी गुंजीकर असि. डेपुटी एजुकेशन इन्स्पेक्टर बेळगाव व मोचनगड आणि शाकुंतल इ. पुस्तकांचे कर्ते