दुसऱ्या महायुध्दाची आपत्ती जगावर लोटणारा हिटलर. याचे व्यक्तिमत्व होते तरी कसे ? या विषयी आजवर खूप लिहिले गेले व पुढेही लिहिले जाईल. काहींना तो देशभक्त वाटतो तर काहींना माथेफिरु. युध्दानंतर जन्मलेल्या नव्या जर्मन पिढीला मात्र हिटलर प्रिय नाही. जर्मनीवर संकट आणणारा व एक जर्मन पिढी नष्ट करणारा क्रूर मनुष्य म्हणूनच जर्मन तरुण त्याच्याकडे पाहतात. ज्याला नवनाझीवाद म्हणतात अशी काही माणसे जर्मनीत आहेत पण ती फारच अल्पसंख्य आहेत. १९३० पर्यंत हिटलर जर्मनीमध्ये फारसा कुणाला माहितही नव्हता. त्याचा उदय व त्याला मिळालेली सत्ता हा उदारमतवा जर्मनीच्या इतिहासात एक अपघात आहे. या पुस्तकात हा दृष्टिकोन बाळगूनच हिटलरचे चरित्र लिहिलेले तुम्हाला आढळेल. चरित्र लिहितांना चरित्रनायकासंबंधी काही दृष्टिकोन बाळगावाच लागतो. तसे केले नाही तर ते चरित्र रिपोर्टवजा होते. हिटलरचे विचार फारच एकांगी व टोकाला जाणारे होते व आपल्या कृतीच्या परिणामांचा तो विचार करीत नसे. असे एकारलेल्या विचारांचे व टोकाला जाण्याची मनःस्थिती असलेले लोक सर्व देशात सर्वकाळी आढळतात. पण त्यांच्या हाती कधीही सत्ता येत नसते. हिटलरच्या हाती सत्ता पराकोटीची एकवटली आणि त्याने सर्व जगाला दुसऱ्या महायुध्दाच्या खाईत ढकलले. चर्चिलसारखे नेते नंतरही म्हणत होते की दुसरे महायुध्द कोणत्याही परिस्थितीत टाळायलाच हवे होते. जर्मनीतील सत्तर टक्के पुरुष प्रजा या महायुध्दात नष्ट झाली. इतके बलिदान देऊन हिटलरला युरोपच्या नकाशात थोडाही बदल करता आला नाही. म्हणून जगाच्या इतिहासात हिटलर एक क्रूरकर्मा म्हणूनच सदैव नोंदलेला राहील. प्रस्तुत पुस्तकाची ही सहावी आवृत्ती आहे. १९७८ मध्ये प्रसिध्द झालेली पहिली व त्यानंतरची दुसरी आवृत्तीही अल्पावधीतच संपली. एकछत्री हुकुमशाही कशी तयार होते याचे चित्रण या चरित्रात केलेले आढळेल. अशी हुकुमशाही आपल्या देशात निर्माण होऊ नये म्हणून अशा चरित्राचे वाचन तरुण पिढीने केले पाहिजे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.