विज्ञान आणि वैद्यकशास्त्राने खूपच प्रगती केली आहे ह्या बद्दल शंकाच नाही. पण हे ही तितकंच खरं आहे की वैद्यक शास्त्र हृदयरोगाशी सामना करण्यात पूर्णपणे अयशस्वी झाले आहे. पूर्ण जगात हार्ट केअर क्लिनिक्स ची संख्या वाढत असूनही हृदयरोग्यांची संख्याही वाढत आहे. काय कारण आहे ? ह्या पुस्तकाचे एकच वाचन हे रहस्य उलगडू शकेल. वैद्यकशास्त्राचे अपयश पाहता अशी पद्धत विकसित करण्याचा विचार निर्माण झाला जी ना केवळ हा रोग वाढण्याचा थांबवू शकेल तर रोगाचे मूळच नष्ट करेल. ह्याच विचारांचा परिणाम म्हणजे साओल हार्ट प्रोग्रॅम SAAOL : Science & Art of Living आहे. आपली प्राचीन सांस्कृतिक परंपरा ही विकसित उपचार पद्धती जीवनशैली आणि आधुनिक विज्ञान व वैद्यक शास्त्राचा संतुलित मेळ आहे. आजपर्यंत शेकडो लोकांनी ह्याचा फायदा घेतला आहे. साओल म्हणजे काय ? शल्य चिकित्सेपेक्षा कसे चांगले आहे ? महाग तर नाही ? ह्याचे साईड इफेक्ट काय आहेत ? किती वेळांत परिणाम दिसतो ? असे प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. ह्या सर्व प्रश्नांची साधी आणि सोपी उत्तरे ह्या पुस्तकात वैज्ञानिक तर्कसुसंगत आणि विश्लेषणात्मकरित्या दिली आहेत.<br>डॉ. विमल छाजेडांच्या अथक प्रयत्न आणि शोधामुळे ह्याचा जन्म झाला. आज हृदयरोग उपचाराचे जनक मानले जाणारे डॉ. डीन ऑर्निश ह्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमास मान्यता दिली आहे. ना केवळ भारतात तर पूर्ण जगात लोक ह्याचा लाभ घेत आहेत. डेक्कन हेरॉल्ड नी म्हटले - जास्त करून बायपास शस्त्रक्रिया टाळता येतात. (Most Bypass surgeries are avoidable) हिंदुस्तान टाईम्सने म्हटले - साधी जीवनशैली हृदयरोग कमी करू शकते. (Simple Life style can reduce heart disease) आणि त्याचा लाभ घेतलेले रोगी म्हणतात - बायपास शस्त्रक्रियेची हृदयरोग व त्यापासून मुक्ती मिळवून देणारी साओल पद्धती समजून घ्या.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.