*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹412
₹550
25% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
सदर पुस्तक हे ‘फोर्ड कंपनी’चे माजी अध्यक्ष आणि ‘क्रायस्लर’ कंपनीचे अध्यक्ष ली आयकोका यांचे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रात त्यांचे बालपण कौटुंबिक शैक्षणिक वातावरण याबरोबरच त्यांचे व्यावसायिक जीवन यांचं त्यांनी वर्णन केलं आहे. हाडाचे व्यावसायिक असणाऱ्या ‘ली आयकोका’ यांना फोर्ड मोटार कंपनीत बऱ्याच संघर्षानंतर अध्यक्षपद मिळाले. कणखर व्यक्तिमत्त्व चतुराई योग्य निर्णयक्षमता उच्च व्यावसायिक क्षमता यांच्या जोरावर त्यांनी अमाप यश मिळवले. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक व वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार अनुभवले. फोर्ड मोटार कंपनीला यशाच्या शिखरावर पोहचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी ‘फोर्ड’विषयी त्यांना वाटणारे प्रेम आणि विक्षिप्त स्वभाव असणारा हेन्री फोर्ड याचाही उल्लेख केला आहे. ‘हेन्री फोर्ड’च्या या विक्षिप्त स्वभावाचा मोठा फटका ‘आयकोका’ यांना बसला. कोणतेही कारण नसताना अचानकच त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. त्या वेळी ‘क्रायस्लर’ कंपनीने त्यांना आपल्याबरोबर काम करण्याची संधी दिली. परंतु लवकरच ‘क्रायस्लर’ डबघाईला आली. ‘क्रायस्लर’सारख्या दिवाळं निघालेल्या कंपनीला सुस्थितीत आणून ‘आयकोका’ खऱ्या अर्थाने ‘हिरो’ झाले. या आत्मचरित्रातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पुढे येतात. आपल्या कुटुंबावर नितांत प्रेम करणारे आयकोका तत्त्व निष्ठा मूल्य यांचा आदर करतात. प्रामाणिकपणाला महत्त्व देणारे आयकोका एक अजब रसायन आहेत. आयकोका यांना मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल जेव्हा विचारले जाते तेव्हा ते आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणुकीबद्दल सांगतात. ते म्हणतात ‘‘मन लावून काम करा. जितके शिकता येईल तितके शिका; पण काहीतरी करा. नुसते उभे राहू नका. काहीतरी करून दाखवा. ते काही सोपे नाही; पण प्रयत्न करत राहिलात तर मुक्त समाजात तुमची इच्छा असेल तेवढे तुम्ही मोठे होऊ शकता हे आश्चर्यकारक आहे! आणि अर्थात देवाने जे काही दिले असेल त्याबद्दल कृतज्ञ राहा!’’