लेखक पी.डी. देशपांडे यांनी त्यांच्या ‘इंडिया डायरी’ या पुस्तकात गेल्या ७६ वर्षांतील भारताच्या प्रगतीचा ऐतिहासिक दस्तावेज सादर केला आहे. ऑगस्ट १९४७ ते जुलै २०२३ या कालखंडातील विविध क्षेत्रातील प्रमुख घटना आणि घडामोडींचे संशोधन आणि विश्लेषण करून त्यांनी हा लेखाजोखा सिद्ध केला आहे. भारताचे विविध क्षेत्रातील यश मार्गात आलेल्या अडचणी आणि समोर असलेल्या आव्हानांच्या ठळक नोंदी त्यांनी या पुस्तकात अभ्यासपूर्ण आणि सोप्या शैलीत दिल्या आहेत. नव्या पिढीसाठी ही ‘इंडिया डायरी’ उत्तम संदर्भ पुस्तक ठरेल. लेखकाविषयी : प्रमोद (पी. डी.) देशपांडे चार्टर्ड क्वालिटी इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल रजिस्टर ऑफ सर्टिफिकेट ऑडिटर्स (2022) द्वारे ISO 9001:2015 करिता मान्यताप्राप्त लीड ऑडिटर आहेत. पी.डी. देशपांडे हे मनाने कवी व्यवसायाने माजी बँकर आणि कृतीने सामाजिक कार्यकर्ते आहेत. नेतृत्व विकास स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मनुष्यबळ विकास क्वालिटी ऑडिटिंग लेखन एनजीओ मॅनेजमेंट समावेशक शाळांचे व्यवस्थापन अशी अनेक कौशल्ये त्यांनी आत्मसात केली आहेत आणि ते यांसाठी प्रशिक्षणही देतात. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.