*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹147
₹150
2% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
ईशोपनिषद किंवा ईशावास्योपनिषद हे दशोपनिषदांपैकी सर्वाधिक प्राचीन उपनिषद मानले जाते. ज्येष्ठ संस्कृत पंडित गंगाप्रसाद उपाध्याय यांनी ईशोपनिषदावर केलेल्या हिंदीतील भाष्याचा प्रा. सुरेश गर्जे यांनी मराठीमध्ये केलेला रसाळ व वाचनीय अनुवाद या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. प्रत्येक मनुष्यप्राणी काही ना काही कारणाने या पृथ्वीवर अवतरला आहे आणि ते कारण म्हणजे जीव आणि आत्मा यांचे एकत्व साधणे. असे झाल्यास मृत्यूची भीती उरणार नाही अशी ग्वाही हा अनुवाद आपल्याला देतो. लेखकाविषयी : प्रा. सुरेश भास्करराव गर्जे हे उदगीर येथील संस्कृत व मराठी भाषेचे जाणकार अभ्यासक आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केले आहे. संस्कृत व मराठीमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान अध्यात्म नीतिविषयक विवेचनात्मक लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.