शिवाजी राजे हे १७व्या शतकातील जनतेचे हित जोपासणारे सर्वगुणसंपन्न असे आदर्श राजे होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात जनसामान्य कल्याणसाठीच आपले जीवन समर्पित केले. रयतेच्या ज्ञानवंत बुद्धिवंत गुणवंत व राजकारण धुरंदर असा शूर व पराक्रमी राजा मध्ययुगात दूसरा कोणी झाला नाही. धाडस शौर्य व चातुर्य हे गुण त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे स्थायीभाव होते. त्यांनी दलित पीडित व दुर्बलांना योग्य न्याय देण्याचे महान कार्य केले. स्त्रियांना माता-भगिनीप्रमाणे वागविले व त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. असा थोर नीतिमान राजा समाजातील सर्व लोकांना वंदनीय वाटतो. शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेने वागविले व त्यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. अशा या जनकल्याणकारी राजाबद्दल रयतेच्या मनात आदराची भावना आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.