*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹455
₹500
9% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
आजही जातिव्यवस्था टिकून असण्यात काहीच वावगे नाहीअसे मानणारा वर्ग भारतभर आहे. जातीचा प्रश्न हा केवळ मागासवर्गीयांचा प्रश्न नाही तर तो सर्व भारतीयांचा प्रश्न आहे. ‘जात’ ही समाजशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ती अभ्यासली जावी यासाठी प्रचंड वाव आहे आणि त्याच भूमिकेतून हे पुस्तक साकार झाले आहे.या पुस्तकाचे लेखक प्रा. संजयकुमार कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि जी. एस. घुर्ये यांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास करत समकालीन परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील जातिविषयक विचार हा कोणत्या प्रकारचा होता कोणत्या सिद्धान्तांना मान्यता दिली जात होती कोणते सिद्धान्त पुसून टाकण्याचे प्रयत्न केले जात होते याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.आजवर अनेकदा आपण पाहिले आहे की जातीय अस्मितांचा पुनरुद्भव ही राजकीय हेतूने प्रेरित घटना आहे. आजही जातनिरपेक्ष नागरिक म्हणून आपली ओळख का रुजत नाही ? जातिभेदाच्या व जातिजन्य अन्यायाच्या अविवेकावर विवेकाने मात का करता येत नाही ? हे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करणारे छळणारे व मनोमन उद्ध्वस्त करणारे आहेत. जातिअंतासाठी जातिविषयक विचार समजून घेणे आवश्यक आहे; त्या दृष्टीने हे पुस्तक नेमकी मांडणी करून वाचकांच्या विचारांना सजग भान देते.