जीवन जगण्याची कला म्हणजे आपली संवेदनशीनलता आपली पात्रता आपली ग्राहकता आपली स्वीकार्यता इतकी विकसित व्हावी की जीवनात जे सुंदर आहे जीवनात जे सत्य आहे जीवनात जे शिव आहे ते ते सर्व आपल्या हृदयापर्यंत पोहचावं. त्या सर्वांचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे परंतु आपण जीवनासोबत जो व्यवहार करतो त्यामुळे आपल्या हृदयाचा आरसा ना चमकतो ना स्वच्छ होतो तर अधिक घाणेरडा होतो. अधिक धुळीने माखतो. त्यात प्रतिबिंब दिसणे अधिकच कठीण होऊन जाते. ज्याप्रकारचं आपण जीवनाला बनवलं आहे सर्व शिक्षण सर्व संस्कृती सर्व समाज मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशेने नाही घेऊन चालले. बालपणापासूनच चुकीचे दिशादर्शन सुरू होते आणि ते चुकीचे दिशादर्शन आयुष्यभर जीवनाची खरी ओळख होण्यापासून दूर ठेवतं. पहिली गोष्ट जीवनाचा अनुभव घेण्यासाठी एक प्रमाणिक चित्त एक शुद्ध मन लागतं. आपले मन एक औपचारीकता आहे फॉर्मल आहे प्रामाणिक नाही आहे. प्रामाणिकपणे ना कधी प्रेम ना कधी क्रोध ना कधी आपण तिरस्कार केला आहे ना प्रामाणिकपणे आपण कधी माफ केले आहे.<br>आपल्या मनाच्या सर्व आवस्था आपल्या मनाचे रूप औपचारीक आहेत खोटे आहेत मिथ्या आहेत. मन जर मिथ्या असेल तर अशा मनासोबत कोण कधी जीवन समजून घेऊ शकतो? सत्य मनासोबतच जीवनाशी संबंधीत होऊ शकतं. आपले सगळे मन आपले सगळे लक्ष औपचारीक आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे.<br>सकाळीच तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर आला आहात आणि कोणी तरी तुम्हाला भेटले आहे. तुम्ही नमस्कार केला आहे. तुम्ही सांगत आहात की त्याला भेटून तुम्हाला खूप बरे वाटले आहे. परंतु मनामध्ये तुमच्या असे भाव आहेत की या दुष्टाची सकाळी सकाळी का भेट झाली. हे गोंधळलेपण आहे. हे अशुद्ध मन आहे ही प्रामाणिक नसण्याची सुरुवात असते. चोवीस तास आपण असेच ढोंगी चेहऱ्याने जगतो तर जीवनाची खरी ओळख कशी होईल? नाते निर्माण होते ढोंगीपणासोबत. जीवनासोबत कसले नातेच जडत नाही.<br>- ओशो
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.