बालचंदभाई एक महान उद्योजक होते. त्यांचे ठिकाणी असलेला द्रष्टेपणा व धडाडी ही अलौकिक अशी होती. त्यांच्या कल्पना भव्य असत आणि त्यांचा कामाचा उरक दांडगा होता. सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतानाच त्यांच्या या गुणांचे दर्शन घडून आले. मुंबईत रेल्वेच्या चौरुळीकरणाचे काम वालचंदभाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू आठवावा तेवढा थोडाच. अशा या असामान्य पुरुषाचे व त्याच्या उदंड कर्तृत्त्वाचे समर्थ व नेटके दर्शनच नव्हे तर यथार्थ मूल्यमापनही या छोट्या पुस्तकात चरित्र-लेखकाने केले आहे. महाराष्ट्राच्या तरुण पिढीला या चरित्राच्या वाचनाने स्फूर्ती लाभेल अशी मला खात्री वाटते. किंबहुना जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची ईर्षा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तिने वालचंदभाईंचे चरित्र मनन केलं पाहिजे असे मी म्हणेन. मिळविण्याच्या खटपटीत असतानाच पुढे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खडी लागेल याचा अंदाज घेऊन त्यांनी एक टेकडीच आगाऊ विकत घेऊन ठेवली होती. त्यांचा आत्मविश्वास जबर असे व उद्या काय घडणार आहे याची अटकळ बांधून ते त्या तयारीने आजच पावले उचलीत. या साऱ्याबरोबर त्यांचे देशप्रेम जाज्वल्य होते स्वदेशीवर निखळ निष्ठा होती. अनेक क्षेत्रात त्यांनी परकी राज्यकर्त्यांशी यशस्वीपणे स्पर्धा मांडली. त्यांचा हा राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याला पूरक होता. देशात उद्योगाचे युग सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशा या थोर विभूतीच्या चरित्राची ओळख आजच्या पिढीला सुबोध व रसाळ पद्धतीने करून देणे आवश्यक होते. ती गरज या पुस्तकाने पुरी होत आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.