*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹128
₹149
14% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
जीवनाचा खरा अर्थ काय आहे आणि मनुष्याचे जीवन हे किती क्षणभंगुर आहे.ते क्षणात नाहीसे होणारे असे आहे परंतु मनुष्याला कोणत्या गोष्टीचा अहंकारलोभ आणि इतर गोष्टींबद्दल गर्व आणि मोठेपणा आहे हे मात्र समजत नाही. या आधुनिक मायानगरीमध्ये तो पैसासंपत्ती आणि पद ह्याच्या नशेमध्ये माणुसकी विसरत चालला आहे .मोजणारी प्रत्येक गोष्ट हि एक दिवस नक्कीच संपते हे तो विसरत चालला आहे.माणसाने हे लक्षात ठेवले पाहिजे कि माणुसकी आणि दुसऱ्यांच्या आत्म्याचा घेतलेला आशीर्वाद हा मृत्यूनंतरही लोकांच्या मनात आणि आठवणीत कायम राहतो.चांगल्या गोष्टी आत्मसाद करणे आणि इतरांशी माणुसकीने आणि आदरभावाने वागणे.ह्या गोष्टींचा आपल्याला मोठेपणा वाटला पाहिजे.शेवटी माणूस मोकळ्या हाताने येतो आणि मोकळ्या हाताने जातो परंतु जाण्या आधी काही लोक समाजाची उन्नती करतात आणि लोकांचे कल्याण करतात अशा व्यक्ती आज अस्तीत्वात नसतानाही त्यांचे महान कार्य लोकांच्या मनात जिवंत असते.मारावे परी किर्तीरुपी उरावेअसे कार्य आपणही जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या पुस्तकाच्या माध्यमातून समाजातील काही कटू सत्य आणि माणसाची सध्याची वस्तुस्तिथि वर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.जीवनामध्ये हताशनिराश आणि कुठेतरी स्वतःला हरलेल्या समजत असलेल्या आणि जगण्याची इच्छा सोडल्यास ह्यातून जगण्याची एक प्रेरणा मिळू शकते .कारण कोणाच्यातरी बोलण्याने आणि आणि शब्दांमुळे कुठे ना कुठे तरी कोणाचे ना कोणाचे जीवन बदलून जात असते.हि गोष्ट मी मानतो. ह्या पुस्तकाच्या माध्यमातून माझा एकाच उद्देश आहे कि लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मकता यावी आणि त्यांना एक चान्गले जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी.