२०१८ मध्ये शिर्डी शहरात संकलित होणारा कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने कचराकोंडीग्रस्त झालेल्या शिर्डीने देशपातळीवर एक स्वच्छ शहर म्हणून नावलौकिक मिळाला. शहराला पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. त्यातून शहर स्वच्छतेसाठी एक लोकचळवळ उभी राहिली. त्यातूनच हरित शिर्डीची आणखी एक चळवळ आकाराला आली. शहरातले रस्ते हिरेवेगार झाले. या सर्व घडामोडी नगर जिल्ह्यातील ‘सकाळ’चे ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी एका पत्रकाराच्या नजरेतून हे सर्व स्थित्यंतर ‘कचराकोंडी ते पंधराकोटी’ या पुस्तकातून अतिशय सहजपणे साध्या आणि सोप्या भाषेत शब्दबद्ध केले आहे. शिर्डीच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर काय घडत होते याचा तपशीलवार संदर्भ त्यांनी या पुस्तकात दिला आहे. रोज संकलित होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून करून त्यापासून उत्पन्न कसे मिळवले लोकसहभाग कसा मिळवला आणि ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणात कसे यश मिळवले याबाबतची माहिती या पुस्तकातून मिळते. लेखकाविषयी : सतीश वैजापूरकर हे नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील ‘सकाळ’चे बातमीदार आहेत. राजकारण शेती सहकार यावर ते सकाळमध्ये सातत्याने लेखन करत असतात. साप्ताहिक सकाळ लोकप्रभा आणि चित्रलेखा या साप्ताहिकात त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. ‘सकाळ’च्या नानासाहेब परूळेकर व पत्रकार कै. वरुणराज भिडे पुरस्कारासह त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘टक्के टोणपे’ हा त्यांचा यूटयुब चॅनल लोकप्रिय आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.