काली आणि काला अर्थात कृष्ण हे दोन्ही अवतार दुष्टांचे निर्दालन करून पृथ्वीवर सुशासन प्रस्थापित करण्यासाठी अवतरले. अहिंसेची शांततेची पुनर्स्थापना आणि सौख्यदायी नवसर्जनासाठी अपवादात्मक परिस्थितीत हिंसा गरजेची आहे असा संदेश महाकाली व काला म्हणजेच कृष्ण या अवतारांनी दिला आहे. काली कालाच्या उत्पत्तीपासून त्यांनी जनमानसावर पिढ्यान् पिढ्या उमटवलेल्या अमिट ठशाची विविधांगी कारणमीमांसा शोधणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक. लेखकाविषयी : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तत्त्वचिंतक व जाणकार लेखक म्हणून जयराज साळगावकर सर्वपरिचित आहेत. कालनिर्णय या विविध भाषांतील जगप्रसिद्ध दिनदर्शिकेचे व कालनिर्णय ब्रॅंडचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन केले असून अर्थशास्त्रीय ऐतिहासिक तत्त्वचिंतनपर अशा विविध विषयांवरील त्यांची पुस्तके गाजली आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.