Kalikamurti


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

या कादंबरीच्या घटना शके ११३० म्हणजे सन १२०८ मध्ये घडलेल्या आहेत असे लेखकाचे म्हणणे आहे. कादंबरीची सुरुवातच कुष्णदुर्ग या किल्ल्यापासून होते आणि ज्या कालिकामूर्ती भोवती कादंबरीचे सर्व कथानक फिरत असते ती कालिकामूर्ती या किल्याच्या तळघरातच आहे. कालिकामूर्ती ज्या तळघरात आहे त्या तळघराच्या खालीही एक तळघर असून त्याही खालच्या तळघरात एक भयंकर यंत्र बसविलेले आहे. कालिकामूर्तीला मानवी बळी दिल्यानंतर बळीच्या शरीराचा चक्काचूर करण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. एका मंडलेश्वराची वारस लीलावती राणी होते आणि तीच अंगाला काळा रंग फासून कालकन्या होते. या लीलावतीचे प्रेम सफल होत नाही म्हणून शेवटी ती योगिनी होते. कादंबरीच्या शेवटच्या भागात कुष्णदुर्ग किल्ल्याला क्रांतिकारक चंद्रचुडाने वेढा घालून ती जिंकून घेतल्याची घटना झालेली आहे. कादंबरीला एकच रहस्य नसून अनेक रहस्ये एकमेकात गुंतलेली आहेत. अनुसुयेचे पात्र असेच रहस्यमय आहे. ती एका शेतकऱ्याने पाळलेली कन्या असून वास्तविक एक राजकन्याच असते. अरे हो! पण सगळीच रहस्ये इथे सांगितली तर तुम्ही कादंबरीत काय वाचाल !!श्री. गो. ना. दातार हे माझ्या कुमारवयात मनावर जबरदस्त ठसा उमटवून गेलेले कादंबरीकार. त्यांच्या कांदबऱ्या म्हणजे कमालीची रंजकता कल्पकता. वाचकाला खेचून नेणारी रहस्यमयता अद्भुत घटनांचा अखंड ठसठशीत प्रवाह व्यक्तीचित्रणे चित्रात्मक शैलीतील वर्णने आणि प्रौढ पण रसाळ भाषा यांचा एक मनोहर मिलाफ दातारांच्या कादंबऱ्यात झालेला आहे. घरात जवळपास वा वाचनालयात उपलब्ध होणाऱ्या त्यांच्या सर्व कादंबऱ्या मी शोध घेऊन वाचल्या; पण कालिकामूर्ती व बंधुद्वेष अधिक आवडल्या. आपल्या नित्य जीवनातून एका रंगीबेरंगी विश्वात आपल्याला नेण्याचे या कादंबऱ्यांचे सामर्थ्य असाधारणच आहे. रेनॉल्ड्स यांच्या कादंबर्‍यांवरुन या कादंबऱ्या रुपांतरीत केलेल्या आहेत हे पुढे केव्हा तरी मला कळले. काहीच बिघडले नाही. परस्थतेचा वास देखील या लेखनाला कधी आला नाही. उत्तम रुपांतर ही देखील एका मर्यादेत; पण नवनिर्मितीच असते. मराठी कादंबरीच्या विकासात दातारांचे ऋण कोणी ना मानो; मी मात्र वाड्.मयीन व्यवहाराकडे वाचकाला वाहून नेणारा एक प्रकांड साहित्यकार म्हणून त्यांना खूप मानतो. रहस्यकथांत रस असणाऱ्यांसाठी दातारांनी हा अमोल खजिनाच निर्माण करुन ठेवला आहे.- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details