कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. शेतकरी प्रचलित १६ सेंद्रिय शेती पद्धतीने कापूस लागवड करतात. परंतु त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत नाही. कृषी विद्यापीठांनी मृदा-विज्ञान (Soil Science) पीक विज्ञानाच्या (Crop Science) आधारावर कापसासह सर्व पिकांच्या लागवडपद्धती दिल्या आहेत. परंतु पुस्तकात शास्त्रज्ञांनी दुर्लक्षित केलेल्या जगातील ७०पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या बायोडायनामिक विज्ञानाचा समावेश करत ''इसाप'' (ISAP-Integrated Sustainable Agricultural Practices) ''एकात्मिक शाश्वत शेती तंत्रज्ञान'' दिले आहे. कापसासाठी जमिनीच्या पूर्व-मशागतीपासून वाणाची निवड बीटी कापूस का नको पेरणी पद्धत बियाणे संस्कार योग्य आंतरपिके त्याचे पीकपोषण पिकसंरक्षण तण व्यवस्थापन वेचणी या कामांचा तपशील व त्याचे बायोडायनामिक (बी.डी.) कॅलेंडरप्रमाणे वेळापत्रक संपर्क पत्ते यांचा समावेश पुस्तकात केला आहे. शेतकरी शेती अभ्यासक विद्यार्थी सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते यांच्यासाठी ''कापूस लागवड'' उपयुक्त पुस्तक आहे. लेखकाविषयी माहिती : लेखक दिलीपराव देशमुख बारडकर हे एमएस्सी (अँग्री) असून सेंद्रिय व बायोडायनामिक शेतीतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ''महाराष्ट्र ऑरगॅनिक फार्मिंग फेडरेशन'' (MOFF) पुणे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. ''इसाप'' ऑर्गेनिक संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांच्या ''शाश्वत डाळिंब शेती'' पुस्तकाला ''महाराष्ट्र साहित्य परिषदे''चा कृषिविषयक पुरस्कार (२०२२) मिळाला असून विविध कृषिप्रयोगांवर आधारित मार्गदर्शनपर दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.