2022 सुरू होऊन दोन महिने पुर्ण झाले.त्या सोबत कोरोनाची तिसरी लाट घेऊन आले.आणि बघता बघता ती लाट उग्र रूप धारण करेल असे वाटत असतांना ती आता माघारी परतायला लागल्याचे सुचिन्ह दिसू लागलय. 2020 ला पहिल्या लाटेत मी सेवानिवृत्ती झालो आणि एक नवा प्रवास सुरू केलालेखनाचा आणि पहाता पहाता माझ्या खात्यांत हो बँकेतून रिटायर्ड झाल्याने बँकेतील शब्द अजून विसरले जात नाहीत किंवा आपोआप ओठांत येतात म्हणादृश्य-अदृश्यसुनयनाहोस्ट इज घोस्ट आणि चित्र आणि चेहरा असे 4 कथासंग्रहराणी तेजस्विनी ही एक कादंबरी आणि काव्यसुमने वेचिली मी हा एक कविता संग्रहएवढे साहित्यधन जमा झाले.त्यांना तुमचा प्रतिसाद देखिल छान मिळाला.खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या.ह्यातिल काही प्रतिक्रिया इतक्या उत्साहवर्धक होत्याकी त्या वाचता वाचताच हा पाचवा कथासंग्रह पूर्ण झाला. माझा कथासंग्रह हातात घेतल्यावर पूर्ण वाचून होई पर्यन्त सोडावासा वाटत नाही.अशा बऱ्याच प्रतिक्रिया आल्या.ह्याला कारण ही तसंच आहे.वाचक होमी केवळ तुमच्या मनोरंजनासाठी आणि करमणुकीसाठी लिहीत गेलोलिहिन.मी दु:ख कां विकावे तुम्हाला.मी स्वतः जेंव्हा काही वाचायला घेतोमाझी इच्छा असते किनिदान हे साहित्य वाचत असतांना माझ्या दु:खाचावेदनांचायातनांचा मला विसर पडावा आणि मी पुन्हा ताजा तवाना होऊनमाझ्या कामास लागावे.मला thought provoking म्हणजे विचार करावयास लावणारे साहित्यही नको असायचे.म्हणून मी असेच लिहायचे ठरविलेकी जे तुम्हाला ताजेतवाने करून देईल.वाचा आणि ताजे व्हा. विचारही जास्त करू नका.चिंता करू नका. “कथाष्टक” ह्या माझ्या कथा संग्रहांत एकूण 8 विविध कथांचा समावेश आहे. बस माझा “कथाष्टक” हा कथासंग्रह उचला आणि ताजे तवाने व्हा.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.