*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹254
₹275
7% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
संवादप्रक्रियेत कमीत कमी संवादघटकांचा ऱ्हास होऊन आपल्याला अभिप्रेत असलेला आशय पोचवणे हा श्याम मनोहर यांचा लेखनविशेष. खेकसत म्हणणे आय लव्ह यू या कादंबरीत क्रिमिनल आणि दयाळ या दोघांतल्या तुंबळ युद्धाची कहाणी आहे. श्याम मनोहरांनी दुसरे तात्या प्रा.वडनेरे संतोष केशव डॉ. मुरलीधर वगैरे पात्रे तपशिलात रंगवली आहेत. एक म्हातारा आपल्या कल्पनेतून ही पात्रे तयार करतो आणि त्यांच्याविषयी लिहितो. ते टेप करून लिहायचे काम करता करता मोठ्ठा डल्ला मारायची स्वप्ने पाहणारा एक तरुण म्हणजे क्रिमिनल. म्हाताऱ्याच्या कल्पनेतून नकळत तयार झालेले एक पात्र जे अनेकदा डायरीत बरेच काही लिहिते ते पात्र म्हणजे दयाळ. अशी एक भन्नाट रचना मनोहरांनी या कादंबरीत केली आहे.श्याम मनोहरांचा निवेदक एका विशिष्ट तिरकस शैलीत बोलतो तसेच याही कादंबरीत आहे. ज्ञान संशोधन सभ्यता संस्कृती अशा संकल्पनांचा आणि त्यांच्या आपल्या समाजातील स्थानाचा उपस्थितीचा खोलवर धांडोळा श्याम मनोहर यांनी या कादंबरीत घेतला आहे.