POOR PEOPLE BEGAN TO LIVE WITH DIGNITY BEGAN TO DEMAND EQUAL STATUS HENCE SOME ATTEMPT ARE MADE TO BRING DISGRACE ON THEM AND BRING THEM INTO DISREPUTE. KITAL WRITTEN BY LAXMAN MANE TRIES TO BRING TO PEOPLE THE HEAT OF THE CRISIS THAT HE WAS IN. ‘उपरा’ या आत्मकथनातून लक्ष्मण माने यांच्या जीवनातील संघर्षाची प्रत्येक ठिणगी मानवमुक्तीच्या ध्यासाकडे झेपावताना दिसते. भटकं खडतर जीवन नव्या पिढीचा संघर्ष अज्ञान अपमान अवहेलना हे लेखकाच्या पाचवीलाच पूजलेलं. आपल्या शिक्षण घेणाऱ्या मुलाने लग्न करावं म्हणून आई-वडिलांच्या जीवाची झालेली उलघाल घायाळ करते. आंतरजातीय विवाह दोन पिढ्यांमधील संघर्ष जातपंचायतीचे चटके सहन करता करता जीव थकतो. लेखकाची जिद्द व त्यातून निर्माण झालेली ‘नवविचारांची तिरीप’ हे ‘उपरा’चं फार मोठं सामर्थ्य आहे. भटकं-पालावरचं जग माणुसकीच्या शोधात निघते... आणि त्याचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जातो. तरीही न थकता सतत समस्यांच्या भोवऱ्यांतून लेखक वाट काढतो व जीवनाचा अंकुर फुलवतो. हे जीवन सच्च्या प्रयत्नवादाची गाथा आहे हे लेखक सिद्ध करतो. समस्यांच्या चक्रव्यूहातून घेतलेली ही झेप आकाशाला गवसणी घालते.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.