''क्रांतिसूर्य : महात्मा बसवेश्वर'' या पुस्तकामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे जीवन कार्य वचने आणि विचारप्रणाली यांच्याविषयी संक्षिप्त पण सखोल माहिती दिली आहे. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात कर्नाटकात लिंगायत विचार प्रसृत करण्यासाठी ''शरण आंदोलन'' छेडले होते. बसवेश्वर कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी इ.स. १९४०मध्ये सुरू केलेली ''अनुभव मंटप'' ही लोकशाहीची तत्त्वे पाळणारी धर्म-संसद उभारली होती. बसवेश्वरांनी ''स्त्री शिक्षणाची व्यवस्था केली. त्यानंतर विणकर मोळी-विक्या शेतमजूर अशा स्त्रियांनी शरण-वचने लिहिली. महायोगी अल्लप्रभू सिद्धरामेश्वर चन्नबसवेश्वर अक्कमहादेवी हरळय्या मधुवारस मडिवाळ माचय्या महादेव मारय्या कक्कय्या बोमय्या शांतरस रामण्णा दसरय्या नागीदेव कांबळे रेमव्वा शिवप्रिया सत्यवती पद्मावती दानम्मा संकव्वे मुक्तायक्का लिंगम्मा लक्कम्या नागलांबिका गंगांबिका नीलांबिका अशा अनेक स्त्री-पुरुष सहकाऱ्यांच्या कार्याचा परिचय दिला आहे. लेखकाविषयी माहिती : प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांनी एमए आणि ‘प्राचीन मराठीतील शिवदैवत-दर्शन’ याविषयात पीएचडी केली आहे. आजरा महाविद्यालय आजरा कोल्हापूर येथे प्रपाठक व माजी मराठी विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी पदवीसाठी ३४ वर्षे पदव्युत्तरसाठी २५ वर्षे अध्यपनाचे कार्य केले आहे. ‘शिक्षणतपस्वी : जे. पी. नाईक’ पुस्तकास उत्कृष्ट चरित्राचे प्रथम पारितोषिक वीरशैव मराठी साहित्यक्षेत्रात विशेष योगदानाबद्दल काशीपीठातर्फे डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.