तरुणांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नवनवीन प्रयोग शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. या सर्वांसाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यासाठी बँक आणि वित्तीय संस्था यांच्याकडे जावे लागते. कृषी कर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञा याबाबतची माहिती शेतकरी आणि तरुणवर्ग यांना असायला हवी. यासाठी लेखक अनिल महादार यांनी कृषिकर्ज भाषा बँकेची हे पुस्तक लिहिले आहे. बँकेचे सहकार्य घेऊ इच्छिणाऱ्या कोणालाही सहज समजेल अशी ‘भाषा बँकेची’ बँकेकडून शेतकऱ्यांना कशाप्रकारे आणि कशासाठी कर्ज काढता येते याची माहिती शेतकरी आणि बँक यांच्यातील नात्याचे मूल्यमापन करणारी तपशीलवार प्रकरणे बँकेच्या व्यवहाराविषयी शेतकऱ्यांना समजेल अशा सुलभ भाषेत केलेली मांडणी बँक आणि कर्जदार यांना येणाऱ्या अडचणीतून कशाप्रकारे मार्ग काढता येतो याचे सोदाहरण मार्गदर्शन बचत गटाविषयी महिलांना असणाऱ्या शंकांचे निरसन करणारा उपयुक्त तपशील लेखकाच्या बँकिंगविषयीच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले पुस्तक! शेतकरी आणि तरुणांसाठी कृषिकर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञांविषयीची उपयुक्त माहिती लेखकाविषयी माहिती : लेखक अनिल शंकरराव महादार यांनी बीएससी (अॅग्री.) सीए आयआयबी डिप्लोमा इन कॉमर्स ''अॅप्लिकेशन इन बँकिंग''चे शिक्षण घेतले आहे. कृषी अधिकारी म्हणून बँक ऑफ इंडिया येथे ३० वर्षे कार्यरत होते. त्यांचे ‘कृषी प्रकल्प’ पुस्तक प्रकाशित झाले असून त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २०२०मधील उत्कृष्टग्रंथ म्हणून ‘ज. रा. कदम पारितोषिक’ प्राप्त झाले आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.