उत्तराखंडातील डोंगराळ प्रदेशात कुमाऊँमधील दुर्गम गावातील शेतकर्याच्या कुटुंबात जन्माला आलेली तिसरी मुलगी जिद्दीने शिक्षण घेऊन खडतर आयुष्याला तोंड देत नवी भरारी घेते तिच्या धडपडीची कहाणी. डोंगराळ प्रदेशातील खडतर जीवनाचे चित्रण वयात येणार्या मुलींच्या भावविश्वाला स्पर्श शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा एका युवतीचा आग्रह बालविवाहामुळे अंधश्रद्धेमुळे उपस्थित होणारे प्रश्न या सर्वांचे सहज चित्रण. स्त्रियांचे दरहजारी पुरुषांमागे कमी होत जाणारे गुणोत्तर स्त्री भ्रूणहत्या या पार्श्वभूमीवर अडथळ्यांवर मात करून उभ्या राहणार्या ङ्गमानाङ्खची कहाणी वाचनीय अनुकरणीय वाटते.