*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹309
₹400
22% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांनी पत्रकारांनी त्यावर विपुल लेखन केले असले तरी ते बरेचसे एकांगी आत्मसमर्थन करणारे आहे| संशोधकांनी अस्सल कागदपत्रांचा मागोवा घेत ग्रंथ प्रकाशित केले आहेत| तरीही या लढ्याचा समग्र आणि तटस्थ मागोवा घेणार्या ग्रंथाची उणीव भासत होतीच| ही महत्त्वाची कामगिरी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रविकिरण साने यांनी या ग्रंथाच्या रूपाने केली आहे| संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम म्हणजेच ङ्गक्त लढा असा एकांगी विचार न करता कॉंग्रेसच्या प्रयत्नांचीही साधार माहिती या ग्रंथात आहे| मराठी कॉंग्रेस नेत्यांचे प्रयत्न का व कसे ङ्गसले आणि हा लढा विरोधी पक्षांच्या हाती कसा गेला समितीच्या आंदोलनाने ‘महाराष्ट्र’ मिळाला तरी ‘मंगल कलश’ मात्र यशवंतराव चव्हाणांच्या हातीच कसा गेला ही सर्व हकीकत ङ्गक्त लढ्याची नाही| विरोधी पक्षांचा वैचारिक गोंधळ अहंमन्यता ङ्गूट महाराष्ट्रातील सामाजिक संघर्षातून आकारलेले नवे राजकारण या सर्वांचा हा लख्ख आरसा आहे| या घुसळणीमधूनच महाराष्ट्राचे आजचे राजकारण तयार झाले आहे| त्यासाठी हा इतिहास समजून घ्यायला हवा| त्यासाठीच हे ग्रंथलेखन|