*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹237
₹275
14% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
एक म्हण आहे 'वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणालाही काही मिळत नाही.' नोकरी करणारी व्यक्ती घरी बसून राहिली तर तिला वेतन मिळेल का ? व्यवसायिकाने आपले दुकानच उघडले नाही तर त्याला नफा मिळेल का ? अमूक एक व्यक्ती आपल्या जीवनात इतके रूपये आणि इतके पैसे कमवील असे काही संखेच्या स्वरूपात लिहिलेले नसते. तो जितके श्रम करील त्याचा अनुकूल वेळ आल्यावर योग्य प्रतिफल तसेच प्रतिकूल वेळ असेल तर कमी प्रतिफल मिळते. अज्ञात भविष्य जाणून घेण्याची इच्छा माणसाला सदैव राहिली आहे. भविष्य आधी माहीत करून घेऊन माणूस वेळेनुसार योग्य योजना आखू शकतो. अनुकूल वेळ असल्यावर माणूस अधिक जोखीम स्वीकारू शकतो तसेच प्रतिकूल काळ असेल तर थोडी सावधगिरी बाळगू शकतो. ज्योतिषशास्त्र फक्त भविष्याची रूपरेखा सांगणारे असते. कष्ट आणि त्रास जातकाला स्वतः सहन करावा लागतो. भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक पद्धती शोधून काढल्या आहेत. त्यामध्ये ज्योतिषाचे स्थान महत्त्वाचे आहे. भविष्य जाणून घेण्याच्या इच्छेबरोबरच त्रास रोग दुःख पीडा मुक्ती यासाठीही विविध प्रयोग झाले आहेत. त्यामध्ये दान यज्ञ रत्न-धारण मंत्र-तंत्र-यंत्र प्रयोग याचा समावेश होतो. या सर्व प्रयोगासाठी जास्त वेळ आणि पैसाही लागत होता अशा वेळी लाल किताबाची रचना करण्यात आली आहे. या दशकातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पुस्तकाचे नाव आहे लाल किताब. लाल किताब विशेषत्वाने त्या लोकांसाठी आहे ज्यांना कमीत कमी वेळेत जास्त पैसे खर्च न करता कोणत्याही पंडिताकडून सल्ला न घेता स्वतः वापर करू शकतो. या पुस्तकात लाल किताबाची संपूर्ण माहिती दिली आहे त्याचबरोबर मंगळ दोष रोग ऋण मुक्ती संतती सुख गृह सुख आयु निर्णय यावर विशेष उपाय दिले आहेत. ग्रह दोष निवारण ग्रहांपासून होणाऱ्या रोगांसाठी लगेच प्रभावी उपाय दिले आहेत. या पुस्तकाला 'संपूर्ण लाल किताब' म्हटले जाऊ शकते. जगप्रसिद्ध ज्योतिषाचार्य प्रसिद्ध आणि लोकप्रिय भविष्यवेत्ते सर्वाधिक ज्योतिषविषयक पुस्तकांचे लेखक डॉ. राधाकृष्ण श्रीमाळी यांनी लिहिलेले हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. ज्या वाचकांना सोप्या भाषेत मराठीत लाल किताब शोधीत होते त्यांच्यासाठी हे पुस्तक शेवटचा टप्पा आहे.