Lilavati Punardarshan (Size in inches7.5x9.5)
Marathi

About The Book

भास्कराचार्यांनी सिद्धांत शिरोमणी हा गणितावरील ग्रंथ इ.स. ११५० च्या सुमारास लिहिला. या ग्रंथाचे चार विभाग आहेत. लीलावती बीजगणित गणिताध्याय आणि गोलाध्याय अशी त्यांची नावे आहेत. लीलावती हा ग्रंथ एखाद्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे आहे. हा ग्रंथ कित्येक शतके अंकगणिताचे पाठ्यपुस्तक म्हणूनच वापरला जात होता. हसत खेळत अंकगणित असे त्याचे स्वरूप आहे. गोष्टी सांगत सांगत गणितासारखा रुक्ष विषयही किती मनोरंजक करता येतो त्याचे हे उदाहरण आहे. या पुस्तकाला 'पाटी गणित' असेही नाव आहे परंतु या ग्रंथात केवळ अंकगणित नसून बीजगणित भूमिती क्षेत्रव्यवहार त्रिकोणमीती अशा अनेक विषयांचा उहापोह केलेला आहे.भास्कराचार्य हे न्यूटन नेपिअर यांच्यासारख्या अनेक पाश्चात्यांच्या तोडीचा गणितज्ञ होते. न्युटनच्या आधी पाचशे वर्ष भास्कराचार्यांना अवकलनातील (कॅल्क्युलसमधील) प्राथमिक तत्त्वाचा पत्ता लागला होता. समाकलनातील (इंटीग्रल कॅल्क्युलस) तत्त्वे त्याला समजली होती. परंतु भास्कराचार्यांनी आपल्या सिद्धांताच्या सिद्धता (प्रूफ्स्) लिहून ठेवल्या नाहीत त्यामुळे भास्कराचार्यांची शिष्यपरंपरा तयार झाली नाही. नाहीतर भारतीय गणितच जागतिक गणिताच्या प्रांतात सर्वश्रेष्ठ ठरले असते.लीलावतीसारख्या पुस्तकांची आजही गरज आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी अंकगणिताची पाठ्यपुस्तके लिहिली होती. आश्चर्याची गोष्ट अशी की नामदार गोखले यांनी आपल्या अंकगणिताच्या पुस्तकात लीलावतीमधील अनेक गणितांचा समावेश केला होता. अशाप्रकारे भास्कराचार्यांची परंपरा थेट विसाव्या शतकात येऊन पोचली होती; म्हणूनच भारताची गौरवशाली परंपरा सांगणाऱ्या लीलावतीसारख्या ग्रंथाचा अभ्यास होणे आजही जरुरीचे आहे. भास्कराचार्याच्या कार्याचा विस्तृत परिचय या पुस्तकात लेखकाने करून दिला आहे. तो मुळातूनचवाचणे योग्य होईल.'लीलावती पुनर्दर्शन' या ग्रंथाचे लेखक नारायण हरी फडके हे मुंबई विद्यापीठात दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक होते. १९३० मध्ये त्यानी एम. ए. परिक्षेत गणितात प्रथमवर्ग मिळावला होता. त्यांचा संस्कृतचा अभ्यासही सखोल होता. 'लीलावती पुनर्दर्शन' या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांनी यातील उदाहरणांचे स्पष्टीकरण दोन्ही तऱ्हेने दिले आहे. जुन्या भारतीय पठडीप्रमाणे आणि आधुनिक गणिताप्रमाणेही. त्यामुळे ज्यांनी आधुनिक गणिताचा अभ्यास केला आहे. त्यांना 'लीलावती' मधील उदाहरणे समजणे फारच सोपे जाते. अशाप्रकारे भास्कराचार्यांच्या सिद्धांतशिरोमणी या संपूर्ण ग्रंथाचे विवेचन होणे जरूरीचे आहे.'लीलावती' हा ग्रंथ म्हणजे एक अद्वितीय करामत आहे. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे हा ग्रंथ कविताबद्ध आहे. त्यात काव्यगुणही आहेत. लीलावती व बीजगणित या ग्रंथांची भाषांतरे जगातील सर्व प्रमुख भाषांतून झालेली आढळतात. १६१२ साली या ग्रंथाचे फार्सीत भाषांतर झाले. स्ट्राची या इंग्रजी लेखकाने १८१३ साली लीलावती इंग्रजीत भाषांतर केले. अशाप्रकारे लीलावती हा ग्रंथ जगात सर्वत्र पसरलेला आहे. ना.ह. फडके भास्कराचार्यांच्या परिचय लेखात म्हणतात “आमच्याकडे असा गणकचक्रचूडामणि जन्माला यावा हे आमचे भाग्य पण आम्ही असे कर्मद्ररिद्री की इ.स. १९५० मध्ये त्याच्या सिद्धांत शिरोमणीची आठवी शताब्दी साजरी करण्यास पूर्णपणे विसरलो. निदान १९९३ मध्ये त्याची आठशेवी
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE