*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹305
₹350
12% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘मॅडम रोझेला आणि पेलीन’ ही कहाणी आहे दोन स्त्रियांची. वंशाने सेफार्मिक ज्यू असलेली अठ्ठ्यायशी वर्षांची रोझेला आणि इस्तंबूलची धर्मान मुस्लीम असलेली विशीतली पेलीन यांच्यातील संवादांतून ही कादंबरी उलगडत जाते. हिटलरच्या अत्याचारांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनही रोझेलाची प्रेमावर श्रद्धा आहे. तर तरुण पेलीनच्या मते प्रेम हे एक थोतांड आहे. या अनेक दृष्टीनी असलेल्या स्त्रिया यांना एकत्र आणणारे धागे म्हणजे इस्तंबूल आणि तुर्की भाषा. रोझेला आपल्या व्यक्तित्वाचे श्रेय या दोहोंना देते. पेलीनच्या दृष्टीने तर इस्तंबूल ही मायभूमी आणि तुर्की ही मायबोली आहे. अत्याधुनिक अशा युरोपियन शहरातलं वास्तव्य ही तिला दिलेली सजा आहे. या दोघींमधला आणखी एक समान घटक म्हणजे दोघींचं एकाकीपण. एकमेकांशी बोलताना हे एकाकीपण हळूहळू दूर होत जातं आणि वंश धर्म वय इत्यादी गोष्टींच्या पलीकडे जाणारं सुंदर नात त्यांच्यात तयार होते. म्हणून संवाद हे कादंबरीच केवळ तंत्र नसून तो या कादंबरीचा आत्मा आहे. सहाजिकच या कादंबरीत निवेदकाला स्थान नाही.