प्रापंचिक सुख-साधने आकर्षणे असताना व असत्याने भरलेल्या वातावरणात राहून भक्ती कशी करावी ही कला शिकायची असेल तर शबरीपेक्षा चांगले उदाहरण कोणते असू शकेल? शबरीने तामसी व असत्याने भरलेल्या वातावरणात राहून भक्तीच्या शीतल अग्नीची निवड केली श्रीरामांची भक्ती केली. ज्या वातावरणात राहून भक्ती करण्यात अडचण येत होती; ते वातावरण संगत तिने सोडून दिली. पण तिने भक्ती करणे सोडले नाही. या ग्रंथात महान रामभक्त शबरीचे भक्तिमय वर्णन केले आहे. या ग्रंथाद्वारे शबरीच्या महान चरित्रावर मनन करत या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात सहज उतरतील. त्यामुळे विपरीत व प्रतिकूल वातावरणात राहूनही भक्ती सर्वोच्च स्तरावर पोहोचेल.