*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹129
₹150
14% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
महापूर ही प्रेमभंगामुळे शिक्षणातल्या बेताच्या गतीमुळे कमी कष्टामुळे विशिष्ट कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या नायकाची हुरहुर लावणारी देवदासची आठवण व्हावी अशी उत्कट नाट्यकहाणी आहे पण महापूर हे नाटक महानिर्वाण व बेगम बर्वे ह्या नाटकांसारखा सार्वत्रिक व सार्वकालिक एकाच वेळी शाश्वत व अशाश्वत सुखदुःखाचा नाट्यानुभव देत नाही कारण त्याचा कालावकाश विशिष्ट व अपवादात्मक आहे -- आणि ही अवस्था ओलांडली जात नाही. अपवाद अपवादच राहतो. महापूर मधे एखाद्या अधिभौतिक अवस्थेचं दर्शन नाही अथवा एखाद्या सामाजिक परिस्थितीचं अवलोकन नाही तर त्यात एका तोल ढळलेल्या तरुणाच्या विशिष्ट मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. महापूर मधली कालावकाश रचना अत्यंत आकर्षक व नाटकीय आहे. इक्वस मधल्या मनोरुग्ण तरुणाची एका मानसोपचारतज्ज्ञाने केलेल्या विचारपूसवजा चौकशीची आठवण येते. स्वतःच निर्मिलेल्या भ्रमात फसलेल्या तरुणाची ही नाटकीय कहाणी चटका लावते. महापूर हे तीव्रोत्कट भावावस्थेचा अनुभव देणारं एक चांगलं नाटक आहे. - राजीव नाईक (आळेकरी नाट्यकालावकाश. मुक्त शब्द ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१)