*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹415
₹475
13% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
आज आधुनिक जीवनपद्धती आणि त्यामधले ताणताणाव यांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडताना दिसत आहेत. हे फक्त कॉर्पोरेट विश्वातच घडतं असं नाही तर सर्वत्रच हे पाहायला मिळतं. चुकीचे राहणीमान खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हृदयरोग अनियंत्रित रक्तदाब मधुमेह कर्करोग अशा आजारांना निमंत्रणच मिळतं. आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात की ज्यामुळे माणसाची रोगप्रतिबंधक शक्ती वाढते तो आहार उत्तम. डॉ. अंजली मुखर्जी यांनी हा विचार अधिक पुढे नेला आहे. आहारामध्ये व्याधी बर्या करण्याची शरीराला नवचैतन्य देण्याची आणि आरोग्य टिकवून ठेवण्याची संपूर्ण क्षमता असते असा विचार त्यांनी मांडला आहे. 'आहारातून उपचार' हे पुस्तक लिहिण्यामागचा त्यांचा हेतूच मुळी हा आहे की योग्य आहाराद्वारे आपण आपलं आरोग्य टिकवू शकतो आपल्या जीवनाला सुविहित आकार देऊ शकतो आणि परिणामस्वरूप आपलं आयुष्य वाढवू शकतो. योग्य आहार म्हणजे कमी खाणे नव्हे तर उत्तम प्रतीचं आणि ज्यातून आपल्या शरीराला जास्तीत जास्त जीवनशक्ती मिळेल असा आहार. डॉ. अंजली मुखर्जी यांनी अगदी सर्दी-पडसे अर्धशिशीपासून ते चेहऱ्यावरील पुटकुळ्या निद्रानाश दमा अल्सर मधुमेह संधिवात स्थूलपणा उच्च रक्तदाब स्त्रियांचे आजार सोरायसिस अशा अनेक लहान मोठ्या आजारात घ्यावयाच्या आहाराची सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे.