Mahikavatichi Bakhar
Marathi

About The Book

उत्तर कोकणचा जुना इतिहास सांगणाऱ्या महिकावतीच्या बखरीचा काळ शके १०६० म्हणजे इ. सन १९३८ पर्यंत मागे जातो. शके १०६० नंतर शके १२२५ पर्यंत निरनिराळ्या लेखकांनी या बखरीत भर घातलेली आढळते. उत्तर कोकणचा इतिहास यात आलेला आहे. सर्व जुन्या बखरीत गद्य-पद्य मिश्रणाची रचना असते तशी या बखरीतही आहे. इतर बखरीप्रमाणेच या बखरीतही निवाडे हकीगती लढायांची वर्णने महजर वंशावळी राजकीय पत्रे वगैरे सर्व प्रकार आहेत. अनेक लेखकांनी या बखरीची रचना केली आहे. महिकावती म्हणजे माहिम. हे सध्याच्या मुंबईतील माहीम नसून वसईजवळचे माहीम आहे. बखरीची ही जुनी प्रत वि. का. राजवाडे यांना कल्याणचे सदाशिव महादेव दिवेकर यांनी दिली. मूळ बखर १०८ पृष्ठांत दिलेली आहे. परंतू मूळ बखरीपेक्षाही वि. का. राजवाडे यांची या बखरीच्या निमित्ताने लिहिलेली एकशेदहा पानांची प्रस्तावना जास्त महत्त्वाची आहे. या प्रस्तावनेत राजवाडे यांनी निरनिराळ्या ४९ मुद्दयांवर विवेचन केले आहे. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मुद्दे बखरीची भाषा काळ त्यातील वंशावळी त्यातील घटना यासंबंधी निगडीत आहेत. परंतु उरलेले निम्मे मुद्दे मात्र वि. का. राजवाडे यांनी इतिहासासंबंधी केलेले चिंतन या स्वरुपाचे आहेत. हे चिंतन अतिशय मूलगामी स्वरुपाचे आहे. त्यांच्या विवेचनाचा सारांश थोडक्यात येथे देत आहे. 'अपरंपार अशी अन्नसंपत्ती कित्येक शतके पुरुन उरेल अशी जागा वगैरे साधनांची अनुकूलता असल्यामुळे ह्या देशात जे लोक स्थायिक राहिले ते मुक्तद्वारी संन्यस्त समाजपराङ्मुख व राष्ट्रपराङ्मुख बनतात. त्यामुळे अन्नाकरिता दाहीदिशा हिंडणाऱ्या व चोऱ्यामाऱ्या खून कत्तली जबरदस्ती दंगे व लढाया ह्यात चूर झालेल्या मध्य आशियातील मोगलादी बिन सुधारलेल्या उनाड लोकांनी या देशात राज्य केले व त्यानंतर अन्नाची दुर्लभता यामुळे एकजूट झालेले समाजनिष्ठ व एकसमाज बनलेल्या युरोपातील मानवसमुहाने या देशाचे राज्य बळकावले. नाना भाषा नाना वंश नाना जाती यामुळे हिंदू लोक दुर्बल झाले आहेत हे म्हणणे खोटे आहे' राजवाड्यांचे हे सर्व विवेचन मुळातूनच वाचले पाहिजे इतके महत्त्वाचे आह. पाश्चात्य इतिहासकार टॉयन्बी यांच्यापेक्षाही राजवाड्यांचे इतिहासविषयक विचार जास्त मूलगामी स्वरुपाचे आहेत. 'वरदा बुक्स' ने छापलेल्या राजवाडे यांच्या चार पुस्तकातून हे विवेचन बहुतांशी आलेले आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE