*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹100
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
MAI LEKRA IS A POETRY COLLECTION BY ANAND YADAV. YADAV BROUGHT LITERATURE FROM VILLAGE IN LIMELIGHT . LIFE IN THE VILLAGE POVERTY CONDITION OF AGRICULTURE ARE THE PLATFORMS OF YADAV SIRS WRITING. HIS POETRY ALSO CONTAINS THIS FEATURES. दर्शनी स्वरूपात `मायलेकर` हा काव्यात्म संवाद आहे. शिक्षण संपवून घरी परतलेल्या मुलाला पाहून आनंदलेली आई आपली स्वप्न खरी होणार या अपेक्षेने मुलांपुढे मांडते आणि शहरी संस्कारामुळे नवी नजर घेऊन आलेला मुलगा आपली स्वप्नं भिन्न असल्याच सांगतो. उभयतांच्या स्वप्नाची परिभाषा बदलली असली तरी दोघांचा भावविश्व एकच आहे. वात्सल्यापोटी मुलाच्या सारया आठवणी आईच्या उरात दाटून येतात. ती त्यांना मुक्तपणे वाट करून देते. शिक्षणामुळे अंतरमुख झालेल्या मुलाला कुटूंबातील विदारक दैत्याची जाणीव होते. कष्टकरी समाज आणि त्याच्या जीवावर सुखासीन झालेला प्रस्थापित वर्ग याविषयीचे आकलन मुलाला विमनस्क करते. हि परिस्थिती बदलण्याचा निर्धारही तो व्यक्त करतो. माय लेकराचा हा संवाद केवळ व्यक्तिगत राहत नाही तर त्यातून ग्रामीण समाजातील गांजलेल्या वर्गाची प्रातिनिधिक वेदना समोर येते.