Maifal: Gud Va Bhaykatha Sangraha भयकथा पुस्तक Narayan Dharap Book नारायण धारप मराठी बुक्स Horror Books In Marathi Set Maiphal [Paperback] Narayan Dharap [Jan 01 2022]…
shared
This Book is Out of Stock!

About The Book

तो दाराच्या आतच बसला होता. पणतीच्या हलत्या ज्योतीकडे पाहत होता आधी ज्योत नुसती वेडीवाकडी फडफडत होती- पण ती थोड्याच वेळात ज्योत सावकाश सावकाश डावी-उजवीकडे वाहत्या गतीने हलायला लागली. त्या गतीत मनावर मोहिनी टाकण्याची शक्ती होती. कोठेतरी बाराचे ठोके पडत होते. ठोके मध्येच थांबले. श्वासही छातीत रुकला. वेळ- तो एक क्षण- ताणला गेला होता. समोर पणतीची एकच ज्योत नव्हती; तारांगणासारख्या असंख्य हजारो ज्योती होत्या. त्या गोलगोल फिरत होत्या. मागच्या भिंतीचे रंग बदलत होते. अंगावरून एक गारेगार वारा जात होता. आत कोठेतरी जाणीव झाली की तो भूतकाळात विलीन झालेल्या मागच्या अशा असंख्य रात्रीचे एकावर एक पडलेले प्रक्षेप पाहत होता. एक एक अलग ज्योत अशा एकत्र येताच झगमगाट झाला होता. लहान लहान वाऱ्याच्या झुळकीचा झपाट्याने वाहणारा वारा झाला होता...आणि असं वाटत होतं की या क्षणाची या लांबत राहिलेल्या क्षणाची कड ओलांडली की काहीतरी खोलीत येणार आहे... सुटकेसाठी ती विलक्षण धडपड! सारी हालचालच गोठली होती! फक्त निद्रव्य मन आतल्या आत तडफड करीत होतं. तो गोठलेला क्षण एखाद्या अतिप्रचंड चक्रासारखा अतिमद गतीने उलटत होता.... त्या चक्राचा तोल मध्यापुढे गेला की ते पलीकडे कोसळेल तो क्षण उलटेल इथे या लहानशा खोलीत अनर्थ माजेल... त्या आधीच.... त्या आधीच....”
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
190
250
24% OFF
Paperback
Out Of Stock
All inclusive*
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE