डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि कायदा या विषयांमधील उच्च कोटीचे विद्वान होते. आर्थिक अडचणींवर मात करून दुहेरी पीएच.डी. प्राप्त करणारे आंबेडकर हे अत्यंत प्रतिभावंत विद्यार्थी होते. अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक वकील अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मूलभूत काम करताना वृत्तपत्रांची निर्मिती केली. कायमच दलितांच्या राजकीय हक्कांचा पुरस्कार केला. भारतीय स्वातंय मिळवताना इंग्रजांना फटकावण्यासही त्यांनी कमी केले नाही. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. त्यांच्या अनेक लेखांतून स्वतःबद्दलचे निवडक लेख वाचकांना निश्चितच प्रेरणादायी ठरतील.<br>'सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती. त्यामुळे धैर्य बुद्धिमत्ता चातुर्य आणि तडफ यांबाबतीत आम्ही इतरांपेक्षा वीतभरही कमी नाही हे सिद्ध करू शकलो. आमच्या गुणांमुळेच सैन्यातील अधिकाऱ्यांच्या जागी आमच्या नेमणुका झाल्या. त्या काळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत. सैन्य छावणी (कॅम्पस) मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे. सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून ते कृतघ्नतेचे लक्षण आहे. अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक सडेतोड विधाने वाचताना वाचक अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.