*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹149
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
रावेर जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप रत्नाकर वैद्य यांनी लिहिलेले माझी भटकंती या छोटेखानी पुस्तकात त्यांनी केलेल्या भारतातील आणि भारताबाहेरील भटकंतीचा लेखाजोखा मांडला आहे. या पुस्तकाच्या विस्तृत शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे या पुस्तकात वैद्य यांनी केलेल्या इस्राईल प्रवासाबद्दल अंदमान निकोबार बेटांबद्दल तसेच मध्य प्रदेशातील मांडू या शहराला दिलेल्या भेटीचा विस्तृत लेखाजोखा तर आहेच पण त्याच बरोबर गोव्याबद्दल आणि कुंभमेळ्याबद्दलही या पुस्तकात लिखाण आले आहे. गोव्याच्या प्रवासाबद्दलचे प्रचलित चित्र आणि त्या प्रदेशाची प्रतिमा टाळून त्यापलीकडे जाऊन लिहिण्याचा प्प्रामानिक प्रयत्न श्री. वैद्य यांनी आपल्या लेखनातून केला आहे. किशोर कुमार यांच्या समाधीबद्दलही त्यांनी या पुस्तकात लहिले आहे आणि पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या भिलारबद्दलही यात लेख आहे. या पुस्तकात रावेर तालुक्यातील पाल या ठिकाणापासून जवळ असलेल्या पण मध्यप्रदेशात एका अनोख्या मंदिराबद्दलही माहिती आहे. हे मंदीर आहे इंदिरा गांधी यांचे. या पुस्तकात नावाप्रमाणे भटकंतीचे उल्लेख असल्याने वेगवेगळ्या वाटांनी लेखकाने पाहिलेल्या स्थळांची माहिती त्यांचे वर्णन आपल्याला गवसते. लेखकाविषयी: दिलीप रत्नाकर वैद्य हे रावेर जळगाव येथे राहणारे पत्रकार असून त्यांनी उपशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. ते सकाळचे तालुका बातमीदार असून गेल्या तीस वर्षांत त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून विविध विषयांवर लेखनही केले आहे. रावेर येथे होणाऱ्या रंगपंचमी व्याख्यानमालेचे ते विश्वस्त आहेत. वृत्तांकनासाठी त्यांनी देशा परदेशात प्रवास केला आहे.