आयुष्य म्हणजे दहा धागे सुखाचे तर त्यापेक्षा जास्त धागे दु:खाचे असतात असं म्हंटल तरी अतिशयोक्ती होणार नाही . म्हणून आयुष्यात दृष्टीकोन महत्वाचा असतो. आपले पूर्ण आयुष्य आपल्या विचारांवर अवलंबून असतं. सकारात्मक विचारांनी कठीण प्रश्नांची तिव्रता कमी होते.लेखिका सौ संध्या बेडेकर यांनी आजूबाजूला घडणारे प्रसंग दैनंदिन जीवनात येणारे प्रश्न जनरेशन गॅप नात्यातील भरती ओहोटी आयुष्यात नकळत होणाऱ्या चूका त्यांचे अनुभव लक्षात ठेवून लहान लहान गोष्टी लिहिल्या. साधारण प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या विचारांवर आधारित गोष्टी आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी आपली प्रतिक्रिया/प्रतिसाद कसा असावा ?? याबद्दल लिहिण्याचा एक सकारात्मक प्रयत्न आहे. प्रत्त्येक गोष्टीत एक संदेश ही आहे. नक्की वाचा. आवडेल तुम्हाला.