*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹174
₹195
10% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘मराठी साहित्य समाज आणि संस्कृती’हा डॉ. आनंद यादव यांचा तिसरा समीक्षा ग्रंथ.या ग्रंथात त्यांनी मराठी साहित्याचा मराठी समाजाशी आणि संस्कृतीशीकोणकोणत्या प्रकारचा संबंध असतो त्या संबंधातून कोणकोणते वाङ््मयीन प्रश्न उपस्थित होतातत्या प्रश्नांना कोणकोणत्या दृष्टीने सामोरे जावे लागते याची मीमांसा मराठी साहित्यातील वस्तुस्थितीच्या आधारे केलेली आहे.या मीमांसेतूनच आधुनिक मराठी साहित्याचे आरंभापासून ते अगदी आजच्या वर्तमान वास्तवापर्यंतचेसामाजिक सांस्कृतिक व वाङ्मयीन स्वरूप आपल्या मनासमोर स्पष्टपणे उभे राहते.या अंगाने मराठी साहित्याच्या मर्यादा व वैशिष्ट्ये स्पष्ट होताना जाणवतात.कादंबरीच्या निर्मितिप्रक्रियेविषयीची मीमांसाही या ग्रंथात प्रा. यादवांनी अनेक कादंबरीकारांच्या मुलाखती घेऊन केलेली आहे.त्यामुळे हा ग्रंथ जाणकार रसिक मराठी वाङ््मयाचे अभ्यासक समीक्षक विद्यार्थी व तरुण साहित्यिकया सर्वांनाच मोलाचा वाटेल असा झालेला आहे. -बाबा पाटील