*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹260
₹295
11% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
सतराव्या शतकात महाराष्ट्रात मराठी सत्तेचा उदय झाला. त्या शतकाच्या उत्तरार्धातच येथे मराठ्यांचे राज्य निर्माण झाल्याचा पुकारा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेऊन केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या नवोदित स्वराज्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत बिकट परिस्थितीत कसोटीच्या काळात हे नवे राज्य सांभाळले. त्यांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही मोठ्या संकटांना तोंड देत राज्य राखावे लागले. तथापि त्यांची दृष्टी केवळ राज्य राखण्यावर नव्हती तर त्याचा विस्तार करण्याच्या बाण्याची होती. राजाराम महाराजांनंतर महाराणी ताराबाई यांनीही अविरत संघर्ष करून मराठ्यांचे राज्य टिकविले. एवढेच नव्हे तर त्यांच्या आणि त्या अगोदर राजाराम महाराजांच्या काळातही मराठी फौजा नर्मदा पार झाल्या होत्या. छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली बाळाजी विश्वनाथाने मराठ्यांच्या साम्राज्य विस्तारास नवी क्षितिजे निर्माण करून दिली. पेशवा बाजीरावांच्या काळात तर मराठ्यांच्या स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात झाले. शिवोत्तर कालखंड ते श्रीमंत पेशवा बाजीराव असा मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्या दृष्टीने बाजीराव पेशवेपूर्व काळातही मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराच्या प्रयत्नांची दखल घेऊन बाजीराव पेशव्यांच्या काळापर्यंतचा इतिहास मांडण्याचे इथे योजले आहे. इतिहासाचे अभ्यासक आणि सामान्य वाचक अशा सर्वांना हे पुस्तक पसंत पडेल अशी खात्री वाटते. Marathi Book on History of expansion of Maratha empire from Chhatrapati Shivaji Maharaj to Bajirao the first.