भाषा ही एक पद्धती आहे आणि भाषेचे घटक सामान्यपणे विशिष्ट नियमांना अनुसरून वागत असतात. पुन्हा हे नियम सुटे सुटे नसतात तर एका समठा नियम व्यवस्थेचे ते भाग असतात. भाषेतल्या ध्वनींची व अर्थवाहक घटकांची रचना व कार्य यांचे दिग्दर्शन ही समठा नियम व्यवस्था करीत असते. ही नियमव्यवस्था पूर्णपणे समजावून घेणे तिच्या मर्यादा जाणणे तिने स्वीकारलेल्या अपवादांची माहिती करून घेणे आणि अशा अभ्यासानिशी समठा नियमव्यवस्थेची पुन्हा जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध मांडणी करणे हेच व्याकरणाचे कार्य होय. पतंजलीच्या ’व्यक्रियते अनेन इति व्याकरणम्’ या व्याख्येचा हाच अर्थ सांगता येतो. हा अर्थ लक्षात घेऊनच डॉ. लीला गोविलकर यांनी प्रस्तुत ठांथात मराठी भाषेचे व्याकरण सिद्ध केल्याचे दिसेल. मराठीच्या विद्यमान प्राध्यापकांमध्ये व्याकरणशास्त्राचा मूलभूत अभ्यास करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी अत्यल्प आहे. डॉ. लीला गोविलकर यांचा समावेश या अत्यल्प प्राध्यापकांत होतो. व्याकरणशास्त्राच्या अभ्यासक म्हणूनच त्या सर्वांना परिचित आहेत. त्यांनी अद्ययावत दृष्टी बाळगून तयार केलेला प्रस्तुत ठांथ व्याकरणाच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल|डॉ. दत्तात्रय पुंडे
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.