मराठी भाषेचा उगम ते भाषाधिष्ठित महाराष्ट्र राज्याची निर्मिती अशी मराठी भाषेचा इतिहास - भूगोल उलगडणारी कूळकथा भाषा म्हणजे एका विशिष्ट जनसमूहाचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास नसतो; तर तो राजकीय सत्ताकांक्षेचा आणि सामर्थ्याचाही इतिहास असतो. समृद्ध आणि प्रसरणशील भाषा असणारा समाज नवनवीन आव्हाने स्वीकारू शकतो आणि राजकीय सामर्थ्य मिळवू शकतो, हे सिद्ध करणारे पुस्तक. या पुस्तकाचे भाषिक विचारांच्या अंगाने असलेले महत्त्व विशद करणारे डॉ. रूपाली शिंदे यांचे प्रास्ताविक, तर राजकीय विचारप्रणालीच्या दृष्टिकोनातून महत्त्व विशद करणारी डॉ. प्रकाश पवार यांचे प्रस्तावनापर विश्लेषक टिपण "मराठीचिये नागरी"च्या संदर्भ मूल्यात भर घालते लेखकाविषयी : महाराष्ट्राच्या इतिहासाची आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातून मांडणी करणारे ज्येष्ठ अभ्यासक महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक, समकालीन घटनांचे जागरूक भाष्यकार अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ घुमान येथे झालेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१५) तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१२)
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.